मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते करणे - योजनेच्या अटी व शर्ती
मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते करणे - योजनेच्या अटी व शर्ती
मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते करणे, पाखाडी बांधणे, संरक्षक भिंत बांधणे या कामांना मान्यता देणेत येते. योजनेच्या अटी व शर्ती निम्नलिखितप्रमाणे आहेत:
- सदर योजनेतुन काम घेणेकरीता सरपंच व ग्रामसेवक यांचे सहीचे सविस्तर पत्र.
- ग्रामपंचायतीचा ठराव
- कामाचे अंदाजपत्रक (तांत्रिक मान्यतेसह)
- गावाची एकुण लोकसंख्या व संबधित मागास प्रवर्गातील अनु.जाती, अनु.जमाती व विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या लोकसंखेचा दाखला.
- प्रस्तावित कामास यापुर्वी अनुदान मंजुर झाले नसलेबाबतचा दाखला.
- सदर काम अन्य योजनेतुन प्रस्तवित केले नसलेचा ग्रामपंचायतीचा दाखला.
- नविन रस्ता तयार करणेसाठी जागेचे बक्षीसपत्र
- पाखाडी, संरक्षक भिंत बांधणेसाठी जागा मालकांचे संमत्तीपत्र.
- जुना रस्ता असलेस ग्रामपंचायतीकडील नमुना नं. 23 चा उतारा.
- सदर योजनेचा लाभ ज्या प्रस्तावित मागासवर्गीय वस्तीत होणार असलेबाबत सरपंच / ग्रामसेवक यांचा दाखला.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा